नगरसेविका प्रियांकाताई बारसे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

नगरसेविका प्रियांकाताई बारसे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

भोसरी (प्रतिनिधी): आदर्श शिक्षण संस्था दिघीरोड भोसरी येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९१ व्या जयंती दिनानिमित्त संत श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महिला शिक्षकांचा विशेष सन्मान सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिप्रेत आदर्श शैक्षणिक कार्य केल्याबद्दल संस्थेच्या मुख्याध्यापिका व प्रभाग क्रमांक पाच कार्यक्षम नगरसेविका प्रियांका प्रवीण बारसे यांचा गौरव सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संघाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल महाराज रघुनाथ गडगे व संताजी महाराज जगनाडे तेली संस्था महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आप्पा शेलार मामा यांच्या हस्ते करण्यात आला. सदर प्रसंगी पालक, शिक्षकवृंद यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला नगरसेविका प्रियांका ताई बारसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संघाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल महाराज गडगे यांनी मनोगतातून गेली पंधरा वर्षापासून आपण ताईंना ओळखत असून आदर्श शिक्षण शाळा व पिंपरी चिंचवड नगरसेविका पदाच्या माध्यमातून ताईंचे जे कार्य भोसरी परिसरात चालू आहे त्याबद्दल कौतुक केले व असेच कार्य त्यांच्याकडून घडत राहो अशा शुभेच्छा दिल्या. सर्व महिलांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई ,जिजाऊ व्हा आणि समाजाला , कुटुंबाला आपल्या मुलाबाळांना चांगले संस्कार द्या अशी सदिच्छा व्यक्त केली.तर संताजी महाराज जगनाडे तेली संस्था महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आप्पा शेलार मामा यांनी आपल्या मनोगतातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाचा मार्ग दाखवून दिला आहे आणि त्याच मार्गाने प्रियंका ताई बारसे आज समाजात काम करताना दिसत आहे असं शिक्षणाचं व्रत जर सर्व महिलांनी घेतलं तर समाज निश्चितच एका चांगल्या मार्गाने प्रगती करणार आहे त्यासाठीच त्यांनी 'जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी 'असे म्हणून महिलांना सक्षम होण्याचा संदेश दिला आहे नगरसेविका मुख्याध्यापिका प्रियांका बारसे यांनी आपल्या मनोगतातून आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त सावित्रीबाईंना अभिप्रेत शैक्षणिक कार्य माझ्या हातून घडत असल्याच्या कार्याचा गौरव श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संघटनेने केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून महिलांनी अधिक कार्यक्षम होणे तसेच अन्यायाविरुद्ध लढणे गरजेचे आहे. न घाबरता महिलांनी एकमेकींना साथ दिली तर समाजामध्ये आपण बदल घडू शकतो असा संदेश उपस्थित महिलांना दिला.

Vishal Maharaj Gadge

Vishal Maharaj Gadge

A/P Alephata, Tal.Junner Dist-Pune, Pune, Maharashtra

[ 23 Posts ]

Recent Comments