महात्मा फुले ब्रिगेड जिल्हा पदाधिकारी बैठक व निधी वितरण सोहळा संपन्न

महात्मा फुले ब्रिगेड जिल्हा पदाधिकारी बैठक व निधी वितरण सोहळा संपन्न

महात्मा फुले ब्रिगेड धुळे जिल्ह्यातील पदाधिकारी यांची संघटनेच्या दृष्टिने महत्वाची बैठक धुळे येथे संपन्न झाली. सदरील बैठक क्रांतिसुर्य महात्मा जोतीराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीआई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महात्मा फुले ब्रिगेड चे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवदास महाजन यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख मार्गदर्शक महात्मा फुले ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय चांबारगे (माळी ), मार्गदर्शक प्रा. डॉ. मेघराज पवळे, प्रदेश सरचिटणीस उत्तम गोरे, प्रदेश संपर्क प्रमुख धनराज देवरे, युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष डॉ. सुनिल देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक आघाडी प्रदेशाध्यक्ष सुरेश माळी यांच्या पदाधिकारी फंड व नियोजनातून संपन्न झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुदर्शन माळी, युवक जिल्हाध्यक्ष महेंद्र महाजन, लातूर विधी आघाडी जिल्हाध्यक्ष एॅड. नितीन मेहत्रे, जळगाव शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष राजेंद्र खैरनार, धुळे जिल्हा कार्याध्यक्ष बाबूलाल महाले, जिल्हा संघटक हर्षल महाजन, जिल्हा सचिव बळीराम पगारे, जळगाव युवक जिल्हाध्यक्ष मनोज माळी, युवक जिल्हाध्यक्ष महेंद्र महाजन, शिरपूर तालुका अध्यक्ष पंकज माळी, लातूर युवक जिल्हाउपाध्यक्ष दीपक डाके व समाजबांधव उपस्थितीत होते. बैठकीत महात्मा फुले ब्रिगेड च्या पदाधिकारी यांना पदाधिकारी फंड चे धनादेश वाटप करण्यात आले. बैठकीत निधी संकलन, पदाधिकारी फंड, क्रांतिसुर्य महात्मा जोतीराव फुले स्मृतिदिन (28 नोव्हेंबर) निमित्त आयोजित महारक्तदान शिबीर नियोजन, कुटुंब जोडा अभियान, "महात्मा फुले समाजरत्न" पुरस्कार व पदाधिकारी मेळावा, 60 वर्षापुढे वय असलेल्या व्यक्तींना तसेच विधवा, दिव्यांग, मूक - बधिर, कॅन्सर ग्रस्त रुग्ण, शेतकरी, शेतमजूर व कामगार यांना सुरू असलेली श्री संत सावता महाराज पेन्शन योजना, शिक्षणाच्या सुरुवातीपासून ते शिक्षण पूर्ण होईपर्यंत सुरु असलेली सावित्रीआई फुले शिष्यवृती योजना, बिनव्याजी 2500 (दोन हजार पाचशे रुपये ) ते 1, 00, 000(एक लाख रुपये ) पर्यंत सुरू असलेली महात्मा फुले स्वावलंबी योजना संबधी चर्चा करून निर्णय घेण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिक्षक आघाडी चे प्रदेशाध्यक्ष सुरेश माळी यानी केले तर सुत्रसंचलन व अभार प्रदर्शन युवक प्रदेश सरचिटणीस शाम गोरे यांनी केले.

Prajyot  Fulsundar

Prajyot Fulsundar

Pimpalwandi , Junnar , Pune, Maharashtra

[ 5 Posts ]

Recent Comments