'स्वातंत्र्याचे गुलाम' गझलसंग्रहास पसायदान प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय विशेष गझल पुरस्कार प्रदान

'स्वातंत्र्याचे गुलाम' गझलसंग्रहास पसायदान प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय विशेष गझल पुरस्कार प्रदान

जुन्नर (जि.पुणे): आळे येथील बाळासाहेब जाधव कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा.जयसिंग गाडेकर यांच्या 'स्वातंत्र्याचे गुलाम' गझलसंग्रहास नुकताच पसायदान प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय काव्यपुरस्कार चिपळूण येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात प्रदान करण्यात आला. 'स्वातंत्र्याचे गुलाम' या गझल संग्रहास ज्येष्ठ साहित्यिक दि.बा.पाटील , मराठी दूरचित्रवाणी क्षेत्रातील प्रसिध्द कथा,पटकथा, संवाद लेखक श्री.किरण येले आणि जितेंद्र आव्हाड युवामंच रत्नागिरीचे प्रमुख श्री. शिवाजी पेडणेकर, पसायदान प्रतिष्ठान गुहागरचे अध्यक्ष डॉ.बाळासाहेब लबडे, ज्येष्ठ कवी आणि समीक्षक डॉ. संजय बोरुडे यांच्यासोबतच साहित्यक्षेत्रातील अनेक मान्यवर कवी व साहित्यिक यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पसायदान राज्यस्तरीय विशेष गझल पुरस्काराने गौरविण्यात आले.

Vishal Maharaj Gadge

Vishal Maharaj Gadge

A/P Alephata, Tal.Junner Dist-Pune, Pune, Maharashtra

[ 20 Posts ]

Recent Comments