राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त फुले दांपत्यास अभिवादन

राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त फुले दांपत्यास अभिवादन

जुन्नर (प्रतिनिधी) : बेलसर येथील सावित्रीबाई फुले आनंद आश्रमामध्ये महान समाजसुधारक जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठान कोपरगाव च्या अध्यक्षा सौ.संगिताताई मालकर व बेलसरच्या सरपंच निताताई ताजणे , सावित्रीबाई फुले आनंद आश्रमाच्या संस्थापिका नंदाताई मंडलिक, माजी सरपंच रेश्मा मंडलिक, सुनिताताई ससाणे श्री.अरविंद मालकर, श्री.दिलीप ससाणे सरस्वतीबाई मंडलिक, गणपत मंडलिक, गणपतराव गडगे, भाऊसाहेब मंडलिक, यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. 'हजारो वर्षांपासून वंचित असलेल्या बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा वाहून आणणारे व स्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे महात्मा जोतीराव फुले व सावित्रीमाई फुले शिक्षक दिनाचे खरे मानकरी आहे' असे नंदाताई मंडलिक म्हणाल्या.

Vishal Maharaj Gadge

Vishal Maharaj Gadge

A/P Alephata, Tal.Junner Dist-Pune, Pune, Maharashtra

[ 22 Posts ]

Recent Comments