श्री संत सावता माळी युवक संघाच्या गंगापूर माळेवाडी शाखेचा उद्घाटन समारंभ संपन्न

श्री संत सावता माळी युवक संघाच्या गंगापूर माळेवाडी शाखेचा उद्घाटन समारंभ संपन्न

श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र यांच्या प्रेरणेने तसेच महाराष्ट्र राज्याच भूषण संस्थापक अध्यक्ष मा. श्री.सचिन भाऊ गुलदगड यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर माळेवाडी येथे श्री संत सावता माळी युवक संघ शाखेचा उद्घाटन समारंभ पार पडला.सामाजिक चळवळीत युवक संघाचे मोठे योगदान आहे. आजवर 32 हजार गरजू नेत्रदानां ना मोफत शस्त्रक्रियेद्वारे पुन्हा डोळस करण्याचे भाग्य संघाला लाभले असून आगामी काळातही अशी सामाजिक कामे अविरत सुरू ठेवणार असे प्रतिपादन युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. सचिन भाऊ गुलदगड यांनी उद्घाटन प्रसंगी केले. राहुरी तालुक्यातील गंगापूर माळेवाडी शाखा उद्घाटन प्रसंगी भव्य असं रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्ष स्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते बबन मारुती भुजबळ तसेच व्यासपीठावर मा. श्री. स्वप्निल भाऊ भास्कर उद्योजक, राज्य सचिव सुनील भाऊ गुलदगड, संघाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव तुपे, अमोल भाऊ वाकचौरे, सल्लागार अजिंक्य मेहेत्रे, सोशल मीडिया प्रमुख दीपक साखरे साहेब, प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी येथील डॉ. पुनम निघूते, डॉ.प्रसाद चौधरी, जनसंपर्क अधिकारी भरत वरपे. चिंचोली गावचे सरपंच गणेश भाऊ हारदे, गंगापूर चे सरपंच सतीश खांडके, पोलीस पाटील एकनाथ नांन्नोर, सयाजी शेंडगे महसूल सहाय्यक राहुरी इ. हस्ते संघाच्या नामफलकाचे व रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात गावातील युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. उद्योजक मेहेत्रे साहेब यांनी बेरोजगार तरुणांना.स्वयंरोजगारासाठी तसेच उद्योगाविषयी बहुमोल मार्गदर्शन केले. तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा याचे आवाहन त्यांनी केले. मा. श्री. स्वप्नील भास्कर, अशोक तुपे, भरत वर्पे आदी. समयोचित भाषण झाली. प्रसंगी शाखाध्यक्ष ओंकार भुजबळ, उपाध्यक्ष साईनाथ भुजबळ, शिवाजी भुजबळ, ओमकार भुजबळ, बाळासाहेब भुजबळ ,नितीन शिंदे, सचिन शिंदे, मुकेश भुजबळ, अमोल भुजबळ, माऊली भुजबळ, तुषार गाडेकर, सोमनाथ शिंदे, महेश भुजबळ आ. पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन शिंदे, आभार प्रदर्शन ओमकार भुजबळ यांनी केले.

Vishal Maharaj Gadge

Vishal Maharaj Gadge

A/P Alephata, Tal.Junner Dist-Pune, Pune, Maharashtra

[ 22 Posts ]

Recent Comments