विशाल महाराज गडगे यांची संत सावता माळी युवक संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी

विशाल महाराज गडगे यांची संत सावता माळी युवक संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी

आळेफाटा (प्रतिनिधी): आळेफाटा (ता.जुन्नर) येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल महाराज गडगे यांची श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संघाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून नुकतेच त्यांना निवडीचे पत्र संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड, राज्य सचिव सुनिल गुलदगड व प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांच्या हस्ते पुणे येथील संघाच्या विभागीय बैठकीत प्रदान करण्यात आले. विशाल महाराज गडगे यांनी यापूर्वी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष पद भूषविले असून कार्यकाळात माळी समाज वधू-वर सूचक मेळावे, महात्मा दिनानिमित्त अन्नदान, वृध्दाश्रमांना आर्थिक सहकार्य, समाजातील प्रसंशनीय व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांसाठी दरवर्षी संत सावता महाराज कार्यगौरव व महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार सोहळ्याचे आयोजन आदी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. तसेच समाजातील विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासनदरबारी सातत्याने प्रशासकीय पाठपुरावे केले आहेत. सामाजिक बांधिलकीची जाणीव जोपासत समाजकार्य करणाऱ्या एका सच्चा व उमद्या कार्यकर्त्याची माळी समाजाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल विशाल महाराज गडगे यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे. त्यांच्या या निवडीचे स्वागत संत साहित्याचे अभ्यासक भागवताचार्य गणेश महाराज शिंदे, श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संघाच्या महिला प्रदेशाध्यक्षा अनुराधा गडगे, ज्येष्ठ अभिनेते सुरेशभाऊ डोळस, पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्न अण्णा डोके, माजी जिल्हा परिषद सदस्या नयनाताई डोके, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आनंद रासकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख मंगेश अण्णा काकडे, पंचायत समिती सदस्या नंदाताई बनकर, अखिल भारतीय महात्मा फुले समता समता परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश भुजबळ, शेतकरी संघटना अध्यक्ष संजय भुजबळ, गोमाता दूध संस्था अध्यक्ष अशोक गडगे, नंदा मंडलिक, सरपंच प्रमिलाताई शिंदे, संघाचे जुन्नर तालुका अध्यक्ष संजयशेठ शिंदे, कार्याध्यक्षा डॉ.पुष्पलता शिंदे यांनी केले.

Vishal Maharaj Gadge

Vishal Maharaj Gadge

A/P Alephata, Tal.Junner Dist-Pune, Pune, Maharashtra

[ 22 Posts ]

Recent Comments